• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भडगाव बँकेतील कर्मचाऱ्यांनीच चोरले बँकेतील कोट्यवधींचे दागिने ; आरोपी अटकेत

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 23, 2021
in क्राईम, भडगांव
0
भडगाव बँकेतील कर्मचाऱ्यांनीच चोरले बँकेतील कोट्यवधींचे दागिने ; आरोपी अटकेत

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून यात बँकेच्या कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या प्रकरणात सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त मूल्याचे दागिने लंपास करण्याचा डाव पोलिसांनी  पर्दाफाश करत उघडकीस आणली आहे.

याबाबत वृत्त असे की,भडगाव  तालुक्यातील आमडदे येथिल महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी व ग्राहक यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अखेर या जबरी चोरीचा उलगडा होऊन पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांच्या पोलीसानी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत या जबरी चोरीचा पर्दाफाश केला आहे. या जबरी चोरीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

घटना स्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक डा. प्रविण मुंडे यांनी भेट देत पोलीस अधिकारी यांना पुढील तपासा बाबत सुचना केल्या आहेत.भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बक शाखा असुन येथे मॅनेजर सह तीन कर्मचारी कार्यरत आहे.  २२ नोहेबर रोजी रात्री १ ते २-३० वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बकेत चोरी झाल्याची माहिती गावात पसरली. चोरी झाल्याची माहिती कर्मचारी यांनेच गावातील नागरीकांना दिली. यावेळी घटनेची माहिती भडगाव पोलीसाना देण्यात आली. पोलीस घटना पोहताच बकेत प्रत्यक्ष घटनास्थळी चोरी करताना चोरां कडुन बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा प्रकार दिसुन येत नव्हता. तसेच बँकेत असलेल्या रोकड रक्कमेला हात लावलेला नव्हता. यामुळे यात बँकेतीलच कर्मचार्‍यांचा सहभाग असावा असा संशय प्रथमदर्शनी येत होता.

दरम्यान, याच बँकेच्या मागे रहाणारा शिपाई राहुल पाटील यास विचारपुस करत माहिती घेतली असता व पोलीसी खाक्या पोलीसानी दाखविला असता तो पोपटासारखा बोलुला लागला. या जबरी चोरी प्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याच्या अन्य दोन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात आरोपी वाढ होण्याची शक्यता पोलीसाकडुन वर्तविली जात आहे. यावेळी जळगाव येथिल श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान, भडगाव पोलीसांनी ताब्यात घेतलेला आरोपी कर्मचारी व अन्य दोन साथीदार यांना बोलत करत जबरी चोरी घटनेतील मुद्देमाल कुठे लपविला आहे याबाबत खात्री करत तिघे आरोपी पैकी एका आरोपीच्या आमडदे शेत शिवारातील जोगडा कडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविलेले दागिणे आरोपीनी काढुन दिले.
घटनास्थळी पोलीस टीम पोलीस पोलीस अधिक्षक डा. प्रविण मुंडे, डीवायएसपी सचिन गोरे, उपविभागिय पोलीस अधिकारी कैलास गावडे, यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक, त्याचे पथक पोलीस लक्ष्मण पाटील, भडगाव सहा. फौजदार कैलास गिते, पोलीस का. विलास पाटील, स्वप्निल चव्हाण, किरण पाटील, ज्ञानेश्वर महाजन, चालक राजु पाटील करीत आहेत.

या प्रकरणात नेमकी किती रूपयांचे दागिने चोरण्यात आले होते याची माहिती मिळाली नाही. मात्र हा आकडा दोन ते तीन कोटी रूपयांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Previous Post

जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Next Post

पाटणा येथे विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू !

Next Post
पाटणा येथे विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू !

पाटणा येथे विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group