अहमदनगर : वृत्तसंस्था
अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर तालुक्यातील बेलापूर-उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात बुधवारी रात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी व्यावसायिक नईम रशीद पठाण यांचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर घरातील सात लाख रुपये लुटले. मारहाणीत पठाण यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नईम पठाण पठाण यांनी जागेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये घरे आणले होते. कुणीतरी पाळत ठेवल असावी. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या पत्नी बुशरा यांनी बाथरुमला जाण्यासाठी दरवाजा उघडताच दब धरून बसलेले चोर आत आले. त्यांनी नईम व त्यांच्या पत्नी बुशरा यांना मारहाण केली. ओढणीने नईम यांच्या गळ्याला फास आवळला. त्यात नई यांचा मृत्यू झाला.