जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चार गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद आणि धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (42), टोळी सदस्य आरीरफ शेख तस्लीम खान (24), असलम खान अयाज खान (30, सर्व रा.कुरेशी मोहल्ला) या टोळीवर नशिराबाद, एमआयडीसी, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, धरणगाव, पहूर, चाळीसगाव शहर, नशिराबाद व चाळीसगाव रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ठाण्यात आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याने हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
या सोबतच कासोदा पोलीस ठाण्यात अमीन हुसेन शेख (रा. उत्राण, ता.एरंडोल) याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल होते शिवाय त्याच्यावर दोन प्रतिबंधक कारवाया झाल्या मात्र त्यानंतरही संशयिताच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार त्याला देखील जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.