छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी एका वृद्धाच्या अंगावर रात्री झोपेतच अॅसिड टाकले. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील म्हसरुळ येथे उघडकीस आली. श्रीरंग हरीबा शेजूळ (८५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीरंग शेजूळ हे १ सप्टेंबर रोजी रात्री घरासमोरील अंगणात बाजेवर झोपले होते. तेव्हा संशयितांनी त्यांच्या अंगावर अॅसिड फेकले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. सोमवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
गावातील संशयित नंदू किशो- शेजूळ यांनी तीन महिन्यांपूर्व श्रीरंग शेजूळ यांना धमकी दिली होती. तसेच नंदू भास्कर साबळे यानेही श्रीरंग शेजूळ यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमक दिली होती.त्यांनीच वडिलांच्या अंगावर जि मारण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकल्याचे फिर्यादीत नमू आहे. पोलिसांनी संशयित नंदू किशो शेजूळ (३३) याच्या घरातून अॅसिड जप्त केले असून, त्याला अटक केली आहे.