नांदेड : वृत्तसंस्था
पत्नी झोपेत असताना पतीने तिची हत्या केल्याची बातमी उघड झाली आहे. हत्या केल्यानंतर पतीने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका आज सकाळी घडलेल्या या हत्येच्या घटनेने हादरला आहे. किनवट तालुक्यातील भिसी गावात ही घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीची झोपेत हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपाली भालेराव (वय २९), मारुती भालेराव (वय ३५) अस पती पत्नीचे नाव आहे. बुधवारी सकाळी रुपाली यांचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला, तर मारुती यांचा मृतदेह देखील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा तपस करत आहेत. मात्र हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.