अकोला : वृत्तसंस्था
देशसेवेचे स्वप्न रंगविणाऱ्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बुलडाणा येथील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैन्यात भरती होण्यासाठी गणेश विष्णू लोणकर हा तरुण प्रयत्न करत होता. त्यासाठी तो रोज धावण्याचा व व्यायामाच सराव करायचा. सराव करुन घरी आल्यावर गणेशचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृदयविकाच्या झटक्याने हा मृत्यू झाला आहे. या घटनेने गणेश कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. सैन्यात भरती होण्यासाठी गणेश रोज सराव करायचा. सकाळी व्यायाम करुन गणेश घरी आल्यानंतर त्याने चहापाणी केले. चहापाणी केल्यानंतर गणेश अचानक जमीनीवर कोसळला. त्यानंतर घरच्यांनी त्याला तातडीने संग्रामपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेते असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संग्रामपूरमधील टुनकी गावातील या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना घडल्यानंतर गणेशच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. ऐन तरुण वयात मुलगा गेल्याने गणेशच्या आई वडिलांवर शोककळा पसरली आहे. देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गणेश मेहनत करत होता. परंतु काळाने घाला घालावा तसा गणेशचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जाते.