नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात गुन्हेगारीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नकली वस्तूंची विक्री करून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शिवाय खरे सोन्याचे दागिने असल्याचे भासवत नकली दागिने विक्री करत आहेत. असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आला असून यातून नकली सोने विक्री करणाऱ्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात नकली साहित्य विक्री करणारे गावोगावी फिरत आहेत. यातच तिन लोक सोन्याचे नकली झुंबर घेउन गावात फिरत होते. याची माहिती गावकऱ्याना मिळाली होती. त्यासाठी गावकऱ्यांनी तिघांना अडवत आम्हाला नकली सोने विक्री करून फसवणूक करता; असे म्हणत तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एकजण ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना डांगोली येथे घडली. किशोर चुन्नीलाल राठौर (वय ३०, रा. गोंडीटोला, कटंगीकला) असे मृताचे नाव आहे. तर संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८, रा. गोंडीटोला) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.