मुंबई : वृत्तसंस्था
सध्या राज्यातील अनेक भागात पाऊस सुरु असल्याने अनेक लोक पर्यटन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतांना अशाच एका पर्यटणठिकाणाहून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालवण तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेला युवक समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. सुफयान दिलदार शेख (वय 23) असे युवकाचे नाव असल्याची माहिती पाेलीसांकडून प्राप्त झाली.
सुफयान दिलदार शेख हा मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेनंतर त्याच्या समवेत असलेल्या मित्राला मालवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुफयान हा कणकवली तालुक्यातील साकेडी मुस्लिमवाडी येथील रहिवासी आहे. ताे समुद्रात बुडाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिल्याचे पाेलीसांनी नमूद केले.