Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परिसरात दुर्गंधी पसरल्यावर समोर आली ती घटना !
    क्राईम

    परिसरात दुर्गंधी पसरल्यावर समोर आली ती घटना !

    editor deskBy editor deskSeptember 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    राज्यातील गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना भिवंडी शहरातून समोर आली आहे. कल्याण सीमेवर असलेल्या कोनगाव गावातील शामबाग येथे असलेल्या येथे एका इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री समोर आली आहे.

    रात्री खोलीतून दुर्गंध येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलोसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल होत खोलीचा दरवाजा उघडला असता आतमध्ये एका ३० ते ३५ वर्षीय महिलेची धारधार हत्याराने हत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पेपर कटर जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

    या खोलीत ही महिला एकटीच राहत होती मात्र कधी कधी तिच्या सोबत आणखी एक महिला किंवा कधी कधी एक पुरुषही राहत असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. या हत्येचे नेमकी कारण अजून समजू शकले नाही. घटनास्थळी कोनगाव पोलिसांसह ,गुन्हे शाखा पथक,फॉरेन्सिक पथक व पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे दाखल झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास कोनगाव पोलीस करीत आहेत.

    #police bhivandi Crime murder
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मी कुणावरही जबरदस्ती केली नाही ; अशोक खरातचा खुलासा !

    March 27, 2026

    वनविभागाचा छापा; ७,५०० किलो डिंकसह आरोपी पकडले

    March 27, 2026

    चाळीसगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.