नवी दिल्ली : वृत्तसंस्था
श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शिक्षकाने गुरू-शिष्य परंपरेचा अवमान करत असे कृत्य केले ज्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. शिक्षकावर एका विद्यार्थिनीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा आरोप आहे.
तो विद्यार्थिनीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून तोंडाला काळं फासलं आणि नंतर बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकाने विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांवर मारहाणीचा गुन्हाही दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर उपविभागातील 7DD गावातील आहे. तेथील सरकारी शाळेचे शिक्षक राजेश कुमार यांना सोमवारी गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. ग्रामस्थांनी शिक्षकाच्या तोंडाला काळं फासलं. नंतर त्याचा व्हिडिओही बनवण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
शिक्षकाला मारहाण करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांचा आरोप आहे की,त्याने विद्यार्थिनीला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. हा प्रकार कुटुंबीय व ग्रामस्थांना समजताच ते संतप्त झाले. त्यांनी शाळेत पोहोचून शिक्षकाला पकडून बेदम मारहाण केली. शिक्षण विभागाने त्याची चौकशी करण्यासाठी विभागीय चौकशीची स्थापना केली आहे. शिक्षण विभागाने महिलांसह दोन मुख्याध्यापकांची समिती स्थापन केली आहे. ती समिती या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी शिक्षक राजेश कुमार यांच्यावर विद्यार्थिनीला मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर शिक्षक राजेश कुमार यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.