Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस अधिकारी करीत होता दारू पुरवठा ; अधिकाऱ्याने असे पकडले !
    क्राईम

    पोलीस अधिकारी करीत होता दारू पुरवठा ; अधिकाऱ्याने असे पकडले !

    editor deskBy editor deskSeptember 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीचे संकट मोठे होत आहे. त्यातच बिहार राज्यात दारुबंदी आहे. पाजणे, तयार करणे आणि विकण्याला सुध्दा बंदी आहे, असं सगळं असताना सुध्दा बिहार राज्यात दारुची तस्करी सुरु असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. मागच्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुचा साठा सापडला आहे. सध्या बिहारमध्ये एका पोलिसावरती दारु विक्रीचा आरोप लावण्यात आला आहे. राज्यात ची जबाबदारी पोलिसांवरती आहे. त्या पोलिस अधिकाऱ्यासोबत चार पोलिस कर्मचारी लोकांना विक्रीसाठी दारु पुरवत असल्याचा आरोप आहे. बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील हा प्रकार आहे. शनिवारी रात्री ज्यावेळी दारुबंदी पथकाने धाड टाकली, त्यावेळी हे प्रकरण उजेडात आला.

    दारुबंदी पथकाने दारुचा एक पिकअप ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर दारुविक्री करणाऱ्या पाच लोकांना सुद्धा ताब्यात घेतलं आहे. दारुबंदी असताना सुध्दा काही पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने दारु लोकांना पुरवत असल्याची माहिती दारुबंदी पथकाला मिळाली. ज्यावेळी ही माहिती समजली, त्यावेळी पथकाने त्यांच्या हलचाली वाढवल्या. त्याचबरोबर संबंधित सगळ्या लोकांना रंगेहात ताब्यात घेतलं. ९०० लिटर दारु सापडली आहे. सराय पोलिस स्टेशनचा एक अधिकारी आणि चार कर्मचारी या प्रकरणात सापडले आहेत. पटनाच्या दारुबंदी पथकाने सगळ्यांना ताब्यात घेतलं आहे. ज्यावेळी कारवाई झाली, त्यावेळी एक पोलिस कर्मचारी इकडे तिकडे धावत होता. त्याला पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतलं आहे.

    दुसऱ्या दिवशी त्या जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक रविरंजन कुमार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. सापडलेली दारु नष्ठ करण्याचं काम सुरु आहे. 3700 लीटर नष्ठ केली आहे. त्याचबरोबर पोलिस स्टेशनमध्ये 900 लीटर दारु आहे. ही दारु नष्ठ का केली नाही याची चौकशी सुरु केली आहे. दोषी आढळलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवरती कारवाई सुरु केली आहे.

    Adhikari daru police prashasan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.