


- पुणे : वृत्तसंस्था
मागील महिन्यात पुण्यातील कोंढवा परिसरात तीन नराधमांकडून सामूहिक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना अताजी असतांना आता एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना कोथरुड परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खाऊ देण्याच्या बहाण्यानं ३० वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. राजेश चोरगे असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे. पीडितेच्या आजोबांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणाचा अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या घरासमोर राहतात. शनिवारी फिर्यादी यांची ४ वर्षीय नात घराबाहेर खेळत होती. तेव्हा तेथे आरोपी चोरगे त्या आला. पीडितेला खाऊ देण्याच्या बहाण्याने जवळ असलेल्या शंतीबन चौकाजवळ घेऊन गेला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या बसच्या खाली नेऊन त्या या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केला. तिने आरडा ओरडा केल्यामुळे जवळ असलेल्या लोकांनी हे कृत्य पाहिले आणि त्या चिमुरडीला बसच्या खालून बाहेर काढलं.


