• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चा रावेर जिल्हा बँकेच्या उमेदवाराबाबत निकष ठरला खरा : जनाबाई महाजन १ मतांनी विजयी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 22, 2021
in जळगाव, राजकारण
0
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चा रावेर जिल्हा बँकेच्या उमेदवाराबाबत निकष ठरला खरा : जनाबाई महाजन १ मतांनी विजयी

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीत रावेर विकासो मतदार संघात माजी आ.अरुण पांडुरंग पाटील यांना जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहीर पाठींबा दिला होता. परंतू मतमोजणीच्या निकालानंतर जनाबाई महाजन यांचा विजय झाल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामामुळे सर्वच जण चकित झाले आहेत.

जनाबाई गोंडू महाजन यांनी पाठिंबा दिल्यानंतर गेल्या १० दिवसांपासुन राजकीय वातावरण शांत होते. परंतू मतदानाच्या आदल्या दिवशी जनाबाई गोंडू महाजन यांनी राजकीय खेळी खेळत स्वत:च्या पारड्यात मते पाडण्यासाठी अचानक फिल्डींग लावायला सुरुवात केली. शेवटी जाहीर पाठिंब्यानंतरही जनाबाई महाजन यांचा विजय आल्यामुळे तालुक्यातील राजकारणात भविष्यात हमरी तुमरीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर विकासो मतदार संघात जनाबाई गोडू महाजन यांची उमेदवारी खडसे व आ.चौधरी गटातून होती. तसेच माजी आ. अरुण पांडुरंग पाटील यांना भाजपाच्या गटाने पाठिंबा दिल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. माघारीच्या चित्रानंतर जनाबाई गोंडू महाजन यांनी अरुण पाटील यांना जाहिर पाठिंबा दिला होता. तसेच गेल्या १० दिवसांपासुन महाजन हे पाटील यांच्या सोबत होते. परंतु अचानक मतदानाच्या दिवशी वातावरण बदलल्याने माजी आ.अरुण पाटील यांच्या गटाची चांगलीच घालमेल झाली. माजी आ.अरुण पाटील यांच्या गटाने ३२ मतांचा दावा केला होता. तर महाजन गटाने देखील अंतर्गत निवडुन येण्याचा दावा केला होता. परंतू निकालाअखेर जनाबाई गोंडू महाजन यांनी अवघ्या एका मताने विजयी झाल्या. यानिमित्ताने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक पॉलिटिकल ड्रामा रावेरमध्ये खेळला गेल्याचे दिसून आले.

एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र भाजपने बहिष्कार टाकल्यानं तर महा विकास आघाडी च्या सहकार पॅनेलचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळाले. मात्र रावेर येथील उमेदवाराच्या धक्कादायक निकालाने संपूर्ण लक्ष वेधले आहे.

Previous Post

जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात तरुणाचा मर्डर

Next Post

लोणे फाट्याजवळ अपघात, एक जण जागीच ठार

Next Post
लोणे फाट्याजवळ अपघात, एक जण जागीच ठार

लोणे फाट्याजवळ अपघात, एक जण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group