धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर येवू लागले आहे. त्यामुळे हताश झालेले शेतकरी आता राज्य सरकारकडे मदतीची मागणी करीत आहे.
धरणगाव तालुक्यातील नारणे आणि बाबुळगाव या गावातील शेतकऱ्यांच्या पिके पाण्याखाली गेले आहेत काल तापी नदीला महापूर आल्यामुळे वीस बिघे शेती पूर्ण पाब्याखाली गेल्याने शेतकरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये सुकदेव गोविंदा मराठे, जितेंद्र सुकदेव मराठे, गणेश सुकदेव मराठे, शांतीलाल सुकदेव मराठे या शेतकरीचे शेत बाभुळगाव शिवारात असून यांनी यंदा कापसाची लागवड केली होती. पण दोन दिवस झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.