नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सात वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून, तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी व्यक्तीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कैथलचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.गगनदीप कौर यांनी निकाल देताना सांगितले की, आरोपीचा गुन्हा अक्षम्य आहे. हि घटना हरयाणामध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी ३४ साक्षीदार तपासल्यानंतर, १०० पानांच्या निकालात दोषीला फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी दोषी पवनकुमारने दयेची याचना केली, परंतु न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. इयत्ता दुसरीतील मुलीला आमिष दाखवून आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली, असे फिर्यादीत म्हटले. दुसऱ्या दिवशी मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह जंगलातून सापडला होता.