Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात तरुणाचा मर्डर
    क्राईम

    जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात तरुणाचा मर्डर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली.

    ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात राहणाऱ्या सुनील सुरेश टेमकर वय-३६ या तरुणाचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे. गेल्या ५ दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते.

    रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कुणीतरी चॉपरने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याची प्राणज्योत मालावली. जिल्हा रुग्णालयात शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे हे पथकासह पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

    मयत मुलाच्या पश्चात आई, पत्नी योगिता, मुलगा रोनक, मुलगी दीप्ती, भाऊ असा परिवार आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026

    वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या

    March 6, 2026

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.