Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १९ वर्षीय तरुणाने मध्यरात्री घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    १९ वर्षीय तरुणाने मध्यरात्री घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskSeptember 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणांचे नाव तेजस धोंडू पाटील (वय-१९) असे आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आईवडील आणि लहान बहिण राहायला असून त्याच्या वडिलांचे गॅरेजचा व्यवसाय आहे. तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करत होता. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तेजस हा आईवडील आणि बहिण यांच्यासोबत जेवण केले. आणि झोपण्यासाठी ते वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत गेला. दरम्यान, मध्यरात्री त्याने सुताची दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉ. सदाब सय्यद करीत आहे.

    #police Crime suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.