लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील बळीराम पेठेतील बळीराम गंगुबाई शाळेच्या गल्लीत एका पत्राच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये वापर करणाऱ्यावर शहर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाई २१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बळीराम गंगूबाई शाळेच्या मागील गल्लीत एका पत्र्याच्या टपरीतमध्ये संशयित आरोपी नाजीम खान नयीम खान रा. काट्या फाईल, शनीपेठ जळगाव हा बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये करत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना शनीवारी दुपारी १२ वाजता मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दुपारी १ वाजता धाड टाकून १७ हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रिक मोटार, दोन गॅस सिलेंडर असा एकुण २१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोकॉ रतन गिते यांच्याफिर्यादीवरून संशयित आरोपी नाजीम खान नयीम खान याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.