Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन भावांनी घेतला बहिणीचा जीव ; कारण वाचून बसेल धक्का !
    क्राईम

    दोन भावांनी घेतला बहिणीचा जीव ; कारण वाचून बसेल धक्का !

    editor deskBy editor deskSeptember 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोयगाव : प्रतिनिधी 

     

    दोन भावांनी प्रेमसंबंधाच्या संशयातून आपल्या सख्ख्या बहिणीची कुर्‍हाडीचे घाव घालून हत्या केली. ही घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारातील शेतात घडली. या घटनेत चंद्रकला धोंडू बावस्कर (35, तोंडापूर) या महिलेचा मृत्यू झाला. खून प्रकरणी आई-वडिलांसह दोघा भावांविरोधात फर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारातील शमीम शाह कासम शाह याचे शेत आहे. शमीम शनिवारी शेतात काम करत असताना तिथे चंद्रकलाबाई धावत आली. माझे भाऊ आई-वडील मला प्रेमसंबंधांच्या कारणावरून मारून टाकणार असल्याने मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी तिने शमीमला विनवणी केली. त्याने तिला बकर्‍याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले. त्याच वेळी तिचे भाऊ कृष्णा व शिवाजी यांनी तिच्यावर कुर्‍हाडीचे घाव घातले. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सर्वांनी शमीम यालाही मारहाण केली. शमीमने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पळ काढत पोलीस स्थानक गाठले. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु ती हद्द फर्दापूर शिवारात असल्याने फर्दापूर पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. यानंतर शमीम शाह कासम शाह याच्या फिर्यादीवरून मृत तरुणीचे दोन भाऊ, आई, वडील यांच्यावर फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फर्दापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवला.

    #police Crime murder soygaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.