धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव शहरात एका छायाचित्रकार तरुणाने फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळून उत्तम शेती करीत असून नवीन तरुण पिढीला शेती आणि पूरक व्यवसाय करण्यात पण अधिक प्रमाणात रस असल्याचे जाणवत आहे. धरणगावातील छायाचित्रकार सागर पाटील या तरुणाने आपला फोटोग्राफी चा व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळून शेती आणि जोड व्यवसाय पण करत एक नवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा त्याचा ध्यास सुरू आहे.
आताच झालेल्या बैलपोळा मध्ये त्यांनी छान पद्धतीने बैल सजवून, त्यांची मिरवणूक काढली.. यात परिसरातील सर्वच ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्ग उपस्थित होता..अगदी आनंदाने आणि उत्साहाने सर्वानी बैलपोळा साजरा केला.सागर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की ग्रामीण भाग, शेती, पशुसंवर्धन, या सोबत काम करतांना एक वेगळा आनंद आम्हाला मिळतो, याला पुढे अजून आधुनिकीकरण करून आम्हाला नवीन प्रयोग यशस्वी करायचे आहेत..फोटोग्राफी जशी एक कला आहे, तसेच शेती व त्यासोबतच चे व्यवसाय करणे हे देखील आनंददायी व छान आहेच. धरणगाव व परिसरातील सर्वानी मिळून बैलपोळा साजरा करत, एक वेगळा पायंडा परिसरात सुरू केला आहे…या कामी सर्वांनी आपला हातभार लावला, असे मत सागर पाटील यांनी व्यक्त केले.