• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात जोरदार पावसाचा तडाखा : रावेरात पूरसदृश्य परिस्थिती !

editor desk by editor desk
September 16, 2023
in रावेर
0
जिल्ह्यात जोरदार पावसाचा तडाखा : रावेरात पूरसदृश्य परिस्थिती !

रावेर : प्रतिनिधी 

 

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शुक्रवारी संध्याकाळपासून रावेर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे तापी नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाचे बॅकवॉटर रस्त्यावर आल्याने सकाळपासून ऐनपूर-निंबोल रास्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. तर जुन्या अजनाड गावात तापी नदीच्या पुराची पाणी पातळी वाढली असून तहसिलदार बंडू कापसे यांनी येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. तापी नदीच्या पुराची पाणी पातळी वाढत असल्याने तालुक्यातील तापी नदी काठावरील नागरीकांना तहसिलदार कापसे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून पावसाला सुरूवात झाली असून १५ तासापासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तापी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने सकाळी ऐनपूर-निंबोल रस्ता पाण्याखाली गेला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ऐनपूर येथील कब्रस्थान, हिंदू स्मशानभूमी व उर्दू शाळेपर्यंत पुराचे पाणी पोहचल्याची माहिती सरपंच अमोल महाजन यांनी दिली. येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान यामुळे या रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतांमध्ये पुराचे पाणी गेल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.

पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पूर परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाय योजना करण्यासाठी तहसिलदार बंडू कापसे भर पावसात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी अजनाड येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी पुराच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच तालुक्यातील तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व गावांचे तलाठी, पोलिस पाटील, व शासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

Tags: MonsoonRaver
Previous Post

धरणगावातील विध्यार्थी उद्या धावणार : ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉनचे आयोजन !

Next Post

धरणगावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात !

Next Post
धरणगावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात !

धरणगावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री शिंदे
Uncategorized

आ.चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री शिंदे

June 10, 2025
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय !
राजकारण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय !

June 10, 2025
वटपाैर्णिमा विशेष : यंदा दोन दिवस सुवासिनी करु शकणार वटपूजन !
राज्य

वटपाैर्णिमा विशेष : यंदा दोन दिवस सुवासिनी करु शकणार वटपूजन !

June 10, 2025
तलवार व कोयता घेवून दहशत माजविणारा अटकेत !
क्राईम

तलवार व कोयता घेवून दहशत माजविणारा अटकेत !

June 10, 2025
एलसीबीच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करीत कट्टूयाची तस्करीच्या टोळीला घेतले ताब्यात !
क्राईम

एलसीबीच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करीत कट्टूयाची तस्करीच्या टोळीला घेतले ताब्यात !

June 10, 2025
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
क्राईम

आठवडे बाजारात चोरट्यांचा कहर : महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र केले लंपास

June 10, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group