Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावातील विध्यार्थी उद्या धावणार : ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉनचे आयोजन !
    धरणगाव

    धरणगावातील विध्यार्थी उद्या धावणार : ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉनचे आयोजन !

    editor deskBy editor deskSeptember 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

     

    महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी, या उद्देशाने धरणगाव येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेतर्फे रविवारी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजता ‘पी.एम. रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

    रविवारी होत असलेल्या औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चे २०० विद्यार्थी व ५० विद्यार्थिनी ह्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणार आहेत. १६ वर्षाच्या पुढील मुले-मुली व स्त्री-पुरुष यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेला कुठलेही शुल्क आकारलेले नाही. स्पर्धेची सुरूवात रविवारी स. ७ वाजता शासकीय आय.टी.आय. पासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तेथून परत शासकीय आय.टी.आय.पर्यंत असणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकास ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. रोख बक्षीस व प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी दिलीप वाघ सर, (९४०३५५००१७) यांच्याशी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शासकीय प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण व प्रभारी एम.ए. मराठे यांनी केले आहे.

    Dharangaon marethon ran for skill
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात बेकायदेशीर राहणाऱ्या इराणी महिलेची होणार भारतातून हकालपट्टी !

    February 3, 2026

    धरणगाव तालुक्यात वादळ-पावसाचा कहर; रब्बी पिके भुईसपाट

    January 31, 2026

    धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा; हजारो हेक्टरवरील मका-ज्वारी-गहू पिकांचे मोठे नुकसान

    January 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.