लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रावेर विकासो मतदार संघात माजी आ.अरुण पांडुरंग पाटील यांना जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहिर पाठिंबा दिल्यानंतर गेल्या १० दिवसांपासुन राजकीय वातावरण शांत होते. अचानक मतदानाच्या दिवशीच महाजन यांनी राजकीय खेळी खेळत स्वत:च्या पारड्यात मते पाडण्यासाठी फिल्डींग लावल्याने रावेर तालुक्यात अचानक पाठीत खंजीर खुपसले गेल्याने राजकारणाची दिशा आगामी काळात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेवटी जाहिर पाठिंब्यानंतर जर चुरशीची लढत होवून कुणीही विजयी झाला. शेवटी याठिकाणचे राजकारण भविष्यात हमरी तुमरीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर विकासो मतदार संघात जनाबाई गोडू महाजन या उमेदवार खडसे व आ.चौधरी गटाच्या होत्या. तसेच अरुण पांडुरंग पाटील यांना भाजपाच्या गटाने पाठिंबा दिल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली.
माघारीच्या चित्रानंतर जनाबाई गोंडू महाजन यांनी अरुण पांडुरंग पाटील यांना जाहिर पाठिंबा दिला होता. तसेच गेल्या १० दिवसांपासुन महाजन हे पाटील यांच्या सोबत होते. परंतु अचानक मतदानाच्या दिवशी वातावरण बदलल्याने चांगलीच घालमेल माजी आ.अरुण पाटील यांच्या गटाची झाली. माजी आ.अरुण पाटील यांच्या गटाने ३२ मतांचा दावा केला असून महाजन गटाने देखील अंतर्गत निवडुन येण्याचा दावा केला आहे. परंतु १९ मते महाजन यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक पॉलिटिकल ड्रामा रावेर मध्ये खेळला गेला.