Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक
    क्राईम

    निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सहारनपूर (वृत्तसंस्था ) : निवडणूक आयोगाच्या वेबसाइट हॅक प्रकरणी आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. अटकपूर्वी आरोपीने १०,००० हून अधिक बनावट मतदार ओळखपत्रे तयार केली होती. उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सहारनपूरचे एसएसपी एस चेनप्पा म्हणाले की, आरोपी विपुल सैनीने नकुड भागातील त्याच्या कम्प्युटरच्या दुकानातून हॅकिंग केले.

    पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी विपुल सैनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वापरलेल्या पासवर्डद्वारे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर लॉग इन करत असे. याबाबत आयोगाला संशय आला आणि तपास यंत्रणांना माहिती दिली. यंत्रणांच्या तपासादरम्यान सैनी संशयाच्या भोवऱ्यात आला आणि त्यांनी सहारनपूर पोलिसांना सैनीबद्दल माहिती दिली.

    एसएसपी चेनप्पा म्हणाले, “चौकशीदरम्यान सैनीने सांगितले की, तो मध्य प्रदेशातील हरदा येथील रहिवासी अरमान मलिक यांच्या सांगण्यावरून काम करत होता आणि त्याने तीन महिन्यांत १०,००० हून अधिक मतदार ओळखपत्रे बनवली होती. सायबर सेल आणि सहारनपूर गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी सैनीला अटक केली.’

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026

    विम्यासाठी अपघाताचा रचला बनाव : वैद्यकीय अधिकाऱ्यासह ८ जणांना अटक !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.