Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बायको संतापली अन नवऱ्याला दिले पेटवून !
    क्राईम

    बायको संतापली अन नवऱ्याला दिले पेटवून !

    editor deskBy editor deskSeptember 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

     

    प्रत्येक परिवारात घरगुती वाद होत असतात पण अनेक वाद हे काही वेळाने सुटत असतात पण काही वाद मात्र शेवटच्या टोकाला जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. फक्त १०० रुपये मागितले म्हणून बायकोने तिच्या नवऱ्याला पेटवून दिले. कोटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनमारी गावात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. अनुपूर जिल्ह्यातील मनमारी गावात नवरा-बायकोमध्ये वाद झाला. वादाची ठिणगी इतकी पेटली की, बायकोने रागाच्या भरात त्याला पेटवून दिलं. फक्त १०० रुपये मागितले म्हणून बायकोने दुचाकीतील पेट्रोल काढून ते अंगावर ओतले. त्यानंतर पेटवून दिले, असा आरोप पीडित पतीने केला आहे.

    या घटनेत अंगद प्रसाद चौधरी (वय ३२) हा गंभीररित्या भाजला आहे. घटनेनंतर तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. या घटनेबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळाली. जखमी तरूण रुग्णालयात दाखल आहे. त्याचा जबाब नोंदवला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    #police Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.