जळगाव प्रविण पाटील। तालुक्यातील कुसुंबा येथील अंगणवाडी येथे राज्य महिला बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी भेट देवून कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, जळगाव बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परेदशी, तालुका प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार आदी उपस्थित होते.
भेटीदरम्यान आयुक्त रूबल अग्रवाल यांनी अंगणवाडीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ३ते६वर्ष वयोगटातील आकार बालशिक्षण क्रम साहित्य व कृतीची पहाणी केली. पोषण आहार योजना तसेच शासनाच्या अंगणवाडी संबंधित सर्व योजनांचा लाभ व माहिती लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविता की नाही हे उपस्थितांनकडुन जाणुन घेतली. तसेच कुपोषित मुले, रक्ताल्पता असलेल्या गरोदर मातांना व किशोर वयीन मुली यांना पोषण किटचे आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले.
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय चव्हाण सर कुसुंबा खुर्द चे सरपंच, पोलिस पाटील तसेच या कार्यक्षेत्रातील सर्व पर्यवेक्षिका, कार्यालयीन कर्मचारी, गावांतील अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच गावातील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका अर्चना धामोरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका भारती बोरसे यांनी आभार मानले.