मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक पोलिसावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. नागरिकांची सुरक्षा करणे, त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, अशा पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एका वकिल महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विविध ठिकाणी नेवून, बलात्कार करत असल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे.
पालघर पोलीस ठाण्यात सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी असलेले मल्हार धनराज थोरात होता. त्याने नालासोपारा, वालीव आणि दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी काम केलं आहे. पीडित महिला ही 33 वर्षाची असून, ती व्यवसायाने वकिल आहे. आरोपी थोरातने पीडितेला मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ नवऱ्याला पाठवेल, सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत असे. या धमकीचा गैरफायदा घेऊन आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरातने पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला असल्याचा आरोप आहे. त्याच बरोबर तक्रारदार पीडित महिलेचे व्हॉटसॲपवर त्याने नग्न व्हिडीओ आणि फोटो मागवत असे. आरोपीने पीडितेवर कारमध्ये, विविध लॉज, हॉटेलमध्ये बलात्कार केला असल्याचा आरोप आहे. आरोपी हा पीडितेबरोबर जबरदस्ती अनैसर्गिक दुष्कृत्य ही करत असल्याची तक्रार पीडितेने आचोळे पोलीस ठाण्यात दिली आहे. सध्या आरोपी मल्हार थोरात हा फरार आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.