• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
September 14, 2023
in क्राईम
0
वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने घेतले ताब्यात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

ईशान्य रेल्वेचे (गोरखपूर) वरिष्ठ अधिकारी के सी जोशी यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अटक केली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी, तसेच कंपनीची सरकारी नोंदणी आणि नुकताच केलेला करार रद्द करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई केली. सीबीआयने जोशीच्या गोरखपूर आणि नोएडा येथील निवासस्थानांवरही छापे टाकले. तिथून २.६१ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“ईशान्य रेल्वे, गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य अधिकारी के सी जोशी यांना मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कॉन्ट्रॅक्टरने सीबीआयकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ईशान्य रेल्वेला सेवा आणि विविध उत्पादनांची विक्री करणाऱ्या फिर्यादीच्या फर्मला नुकतेच दरमहा ८० हजार रुपये प्रति ट्रक या दराने कंत्राटी तत्त्वावर तीन ट्रकद्वारे प्रदान करण्याचे कंत्राट मिळाले होते” अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.तक्रारकर्त्याने आरोप केला आहे की, केसी जोशी यांनी त्याच्याकडे सात लाख रुपयांची लाच मागितली होती, ती न दिल्यास त्याच्या कंपनीची सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलवरील नोंदणी तसेच नुकतेच मिळालेले करार रद्द करण्याची धमकी दिली होती. केसी जोशी हे १९८८ च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस (IRSS) अधिकारी आहेत.

सीबीआयने सापळा रचून केसी जोशींना लाच घेताना रंगेहाथ पकडले आणि त्याच्या दोन निवासस्थानांवर छापे टाकून २.६१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. सीबीआयने जोशी यांचा संगणक आणि हार्ड डिस्क ताब्यात घेतली आहे. एक टीम अजूनही गोरखपूरमध्ये तळ ठोकून आहे. बुधवारी सीबीआयने केसी जोशी यांना लखनौला आणले. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीबीआय जोशींची कोठडी मागण्याची तयारी करत आहे. जोशी यांनी सीबीआयच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Tags: CBIMan arrest
Previous Post

अखेर मराठा आरक्षण सुटले ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटलांनी घेतले ज्यूस !

Next Post

मुलीकडे दररोज पैसे कुठून येतात ; शाळेत चौकशी केल्यावर बसला धक्का !

Next Post
मुलीकडे दररोज पैसे कुठून येतात ; शाळेत चौकशी केल्यावर बसला धक्का !

मुलीकडे दररोज पैसे कुठून येतात ; शाळेत चौकशी केल्यावर बसला धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group