जळगाव : प्रतिनिधी
आठ महिन्यांपूर्वी चोरलेली दुचाकी जळगावात विक्रीसाठी आलेल्या गौरव अशोक मोटवाणी (रा. जालना) याच्या जिल्हापेठ पोलिसांनी तांबापुरातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली.
निमखेडी शिवारातील रहिवासी असलेले विलास नारायण महाजन यांची दुचाकी १६ जानेवारी रोजी सिंधी कॉलनीतून चोरीला गेली होती. ही दुचाकी गुन्हेगार गौरव मोटवाणी याने लांबविली असून, बुधवारी तो तांबापुरा भागात दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. सलीम सुभान तडवी, पो. कॉ. रविंद्र साबळे, पोकाँ तुषार पाटील, पो.कॉ.जयेश मोरे, पो.कॉ.कैलास शिंदे यांनी कारवाई केली तर पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री डॉ. विशाल जयस्वाल यांचे आदेशान्वये पो. हे. कॉ. सलीम तडवी हे करीत आहेत.