• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांचा छापा : लाखो रुपयांचा बनावट बाम, शाम्पू जप्त !

editor desk by editor desk
September 14, 2023
in जळगाव
0
एमआयडीसी पोलिसांचा छापा : लाखो रुपयांचा बनावट बाम, शाम्पू जप्त !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नेहरू नगरात बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करणाऱ्या दोन जणांवर बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५ हजार ७४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर व गायत्री नगरातील दोघेजण वेगवेगळ्या कंपनीचे बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी सिद्धेश शिर्के यांना समजली व त्यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन मुंढे, पो. ना. योगेश बारी, सचिन पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, छगन तायडे, महिला पोकों राजश्री बाविस्कर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी छापा टाकला. यात नेहरू नगरात राहणारे जयप्रकाश नारायणदास दारा आणि गायत्री नगरातील आकाश राजकुमार बालानी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून सुमारे ७ लाख ५ हजार ७४५ रुपये किमतीचा झंडूबाम, इनो सिक्सर, आयोडेक्स बाटल्या, हार्पिक पावर, डेटॉल साबण, शाम्पूच्या पुड्या, सर्फ एक्सलचे पाऊच असा बनावट मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कंपनीचे फिल्ड अधिकारी सिद्धेश शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जयप्रकाश नारायणदास दारा आणि आकाश राजकुमार बालानी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत

Tags: #jalgaon#policeCrime
Previous Post

अखेर… राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पवारांची वर्णी !

Next Post

‘लयभारी’ कुंटणखाना प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल !

Next Post
‘लयभारी’ कुंटणखाना प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल !

'लयभारी' कुंटणखाना प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group