• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तू पैसे मागणारा कोण ; मी इथला भाई !

editor desk by editor desk
September 13, 2023
in क्राईम
0
तू पैसे मागणारा कोण ; मी इथला भाई !

मुंबई : वृत्तसंस्था

 

आर बी एन नाईट नावाच्या पबमध्ये पब मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पब मॅनेजरने ग्राहकाकडे बिलाचे पैसे मागितले म्हणून ग्राहकाने मॅनेजरवर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये मॅनेजर जखमी झाला आहे. तसेच ही घटना घडताच नवी मुंबईचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा हल्ला करणाऱ्या आरोपीने पोलिसांसोबतही आणि अरेरावीची भाषा केली. बिलाचे पैसे मागितल्यामुळे झालेल्या या हल्ल्यातून आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी परिसरामध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर बी एन नाईट नावाच्या पबमध्ये ग्राहकाकडे पैसे मागितल्यावर त्या ग्राहकाने डायरेक्ट पब मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. पब मॅनेजरने ग्राहकाकडे पैसे मागितले. त्यावेळी ग्राहकाने दादागिरी करत मी इथला भाई आहे. माझ्याकडे पैसे मागतो का? तू पैसे मागणारा कोण, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न करून डायरेक्ट मॅनेजरवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पब मॅनेजर जखमी झाला. पबमध्ये पब मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये राडा झाल्याची ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही घटना घडतात घटनास्थळी ताबडतोब नवी मुंबईचे पोलीस दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे. पब मॅनेजरवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

शहरामध्ये दिवसेंदिवस धारदार शस्त्राने वार करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. क्षुल्लक कारणांवरून डोक्यात राग धरून किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या कारणांवरून वाद होतात. ह्या झटापटीच्या वादामध्ये एकमेकांवर डायरेक्ट धारदार शस्त्राने वार केले जातात. मग यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःचा जीव देखील गमवावा लागतो. नवी मुंबई शहरांमध्ये अनेक वेळा अशा घटना घडल्या असून यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्यामुळे अनेक व्यक्ती जखमी झालेल्या देखील पाहायला मिळाले आहेत. नवी मुंबई पोलिसांकडून वारंवार आव्हान केले जाते. तसेच प्रत्येक ठिकाणी गस्त घातले जातात. मात्र काही व्यक्ती या भाईगिरीच्या नादात किंवा डोक्यात राग शिरल्याच्या नादात अशा प्रकारचे अपकृत्य करतात. नवी मुंबईतील वाशी परिसरामध्ये आठ ते दहा दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. प्रेम प्रकरणाच्या वादातून ती घटना घडली होती. त्या घटनेमध्ये समोरील व्यक्ती ही पूर्णपणे जखमी झाली होती. त्याही वेळी नवी मुंबई पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले होते.

Tags: #policeCrimeMumbai
Previous Post

सरकारी शाळांमधील शिक्षकभरती कंत्राटी पद्धतीने नको ; आ.तांबे यांची आग्रही मागणी

Next Post

अखेर… राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पवारांची वर्णी !

Next Post

अखेर... राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पवारांची वर्णी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group