नाशिक : वृत्तसंस्था
एका पतीने पत्नी झोपलेली असतांना तिची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर त्याने स्वत: देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना बुधवारी १३ सप्टेंबर पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छानगरमध्ये ही घटना घडली. या घटनेत विशाल निवृत्ती घोरपडे आणि प्रीती विशाल घोरपडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. हि घटना नाशिकमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील आडगाव परिसरातल्या इच्छामनीनगर गेल्या काही दिवसापासून विशाल घोरपडे हे आपल्या पत्नी प्रीती घोरपडे हिच्यासह राहण्यासाठी होता. मंगळवारी रात्री काही कारणावरुन त्यांचा वाद झाला होता. दरम्यान, प्रीती गाढ झोपेत असताना विशालने बुधवारी पहाटेच्या सुमारास तिची हत्या केली. प्रीती झोपेत असताना विशालने घरातील मुसळीने तिच्या डोक्यात सपासप वार केले. या घटनेत प्रीतीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर विशालने घरातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, या शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.