Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ममुराबादला एसटी बसवर दगडफेक !
    क्राईम

    ममुराबादला एसटी बसवर दगडफेक !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी: आज एस टी महामंडळाने काही बसेस सुरु केल्यावर त्यापैकी चोपड्याला जाणाऱ्या बसवर ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली .

    एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रतीक्षा यादीतील ३८ चालक व वाहकांना कामावर बोलावून आजपासून जळगाव आगारातून बसेस काही मार्गांवर सोडण्यात  आल्या . यापैकी चोपडा मार्गावर एक बस जळगाव आगारातून दुपारी सोडण्यात आली ही बस चोपड्याकडे जात असताना ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक  केली आणि काचा फोडल्या . या बसवर आजच रुजू करून घेतलेले चालक आणि वाहक नेमलेले होते .

    या घटनेची माहिती कळल्यावर एस टी चे विभाग नियंत्रक भगवान जोगणार आणि त्यांचे सहकारी अधिकारी  घटनास्थळाकडे रवाना  झाले . अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांकडे गुन्हा नोंदवला जाणार आहे .  ( क्रमांक – एम एच २० – बी एल –  ३३६१ ) क्रमांकाची ही बस आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    खा.नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; हृदयावरील उपचार सुरू

    February 10, 2026

    मजुरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या

    February 10, 2026

    दारूच्या नशेत तरुणांकडून जळगावात वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की !

    February 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.