जळगाव : प्रतिनिधी
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मातोश्रीचे सहा सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. मंत्री महोदय दुःखात असून देखील बैलपोळा निमित्त मदतीचा हात म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसदारांना बैल जोडी सजवण्यासाठी साज, ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्यांना किराणा किटचे वाटप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री महोदयांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना स्वतः भेटुन ही भेट द्यायची होती परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर अचानक ओढवलेल्या दु:खा मुळे ते स्वतः पोहचू शकले नाही. तरी देखील दुसऱ्यांच्या अानंदात आपला वाटा असावा या भावनेने त्यांनी आपले दुख बाजुला सारुन शेतकऱ्यांचा पाळा गोड केला. मंत्री महोदय आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव तालुक्यात भादली बु येथे ३, सुजदे, ममुराबाद गावांमध्ये पंचायत समिती सदस्य तुषार महाजन, कंडारी २, शिरसोली २, धानवड येथे तालुकाप्रमुख शिवराज पाटील, कानळदा येथे २, भोकर ३, गाढोदा, घाडी, करंज, नांद्रा बु २, रिधुर येथे बाला सेठ व संदीप पाटील, वडली, दापोरा, जवखेडा, विटनेर २, म्हसावद, पाथरी येथे जिप सदस्य पवन भाऊ सोनवणे, मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे यांच्या सहकार्याने, धरणगाव तालुक्यात जांभोरा, भवरखेडा २, रोटवद, धानोरा, अनोरा २, विवरे, साळवे २, नांदेड या गावात युवा सेना तालुकाप्रमुख दीपक भदाणे,
वरड खु, अंजनविहीरे, भोद बु, चिंचपुरा, कल्याणे खु., वाघळूद खु, सतखेडा, पष्टाने, आहिरे बु, चमगांव ३ येथे युवा सेना उपतालुका प्रमुख अजय पाटील, अनिकेत पाटील पाळधी बु, पाळधी खु, पथराड बु, पथराड खु २, दोनगाव बु, शेरी येथे २, खपाट या गावांमध्ये माजी सरपंच अरुण पाटील यांनी जाऊन गावकरी यांच्या उपस्थित एकूण दोन्ही तालुक्यातील ७५ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वाटप केले.