• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आठ दिवसाच्या मुलीच्या तोंडात दिली बापाने तंबाखू अन घडल ते धक्कादायक !

editor desk by editor desk
September 13, 2023
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
आठ दिवसाच्या मुलीच्या तोंडात दिली बापाने तंबाखू अन घडल ते धक्कादायक !

जामनेर : प्रतिनिधी

दोन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगी झाल्यानंतर बापाने तिची हत्या केल्याची संतापजनक घटना जामनेर तालुक्यात घडली. विशेष म्हणजे नवजात आठ दिवसीय बालिकेच्या तोंडात नराधम पित्याने चक्क तंबाखू टाकली. हरिनगर तांडा, ता.जामनेर येथे रविवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोकुळ गोटीराम जाधव (30) असे या नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.

वाकोदजवळ हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवार, 2 सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर रविवारी चिमुरडीची गोकुळने हत्या केली. आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती. आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावात पोहोचले. त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली. गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली. तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले. गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप म्हणाले.

Previous Post

देवदर्शनासाठी जाणाऱ्या बसचा भीषण अपघात ; १२ जणांचा मृत्यू !

Next Post

फेसबुक लाईव्ह करीत तरुणाने दिला नदीत जीव ; तरुणीने केले होते असे कृत्य !

Next Post
फेसबुक लाईव्ह करीत तरुणाने दिला नदीत जीव ; तरुणीने केले होते असे कृत्य !

फेसबुक लाईव्ह करीत तरुणाने दिला नदीत जीव ; तरुणीने केले होते असे कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group