धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील कापूस उद्योग क्षेत्रातील नामांकित अशी श्रीजी जिंनिंग फॅक्टरी आज दिनांक २१/११/२०२१ रोजी २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आज पासून २० वर्षांपूर्वी याच दिवशी धरणगाव शहरातील दिग्गज व्यक्तिमत्त्व नयनशेठ गुजराथी, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, जीवनआप्पा बयस, स्व. प्रकाशशेठ कर्वा यांनी ‘शेतकरी सुखी तर, जग सुखी’ या संकल्पनेने प्रेरित होऊन, हा उद्योग सुरू केला होता. आज जवळपास या जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मध्ये ५०० कर्मचाऱ्यांचा चरितार्थ चालवत चालतो. सर्व मालक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहेत, गावातील कोणत्याही कार्यासाठी श्री जी च्या माध्यमातून नेहमीच सढळ हाताने मदत केली जाते.
आज सकाळी विधिवत पध्दतीने श्रीजी भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आज कपाशी घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना पेढा आणि नास्ता देऊन वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी श्री जी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.