Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवदर्शनासाठी जाणाऱ्या बसचा भीषण अपघात ; १२ जणांचा मृत्यू !
    क्राईम

    देवदर्शनासाठी जाणाऱ्या बसचा भीषण अपघात ; १२ जणांचा मृत्यू !

    editor deskBy editor deskSeptember 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या बसचा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बसमधील प्रवासी भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होते. मात्र भरतपूर-आग्रा महामार्गावर बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. चालक आणि त्याचा साथीदारासह इतर प्रवासीही बसमधून उतरले. चालक आणि त्याचे साथीदार बस पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान अचानक एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत उपस्थितांनी तातडीने मदतीने पोलीस आणि इतर हेल्पलाईन नंबरवर फोन फिरवले. काही वेळातच मदत तिथे पोहोचली. मात्र अपघात इतका भीषण होता की मृतदेह महामार्गावर विखुरले होते. अपघातानंतर महामार्गावर मोठा चक्का जाम झाला होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026

    वडिलांच्या निधनानंतरही चाळीसगावातील नेहाचा धैर्याचा पेपर; डोळ्यांत अश्रू, हातात पेन !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.