Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एसीबीची मोठी कारवाई : पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच !
    क्राईम

    एसीबीची मोठी कारवाई : पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी तक्रारदारासह नातेवाईकांना अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची लाच घेतांना पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जयवंत प्रल्हाद पाटील (वय-५४) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली. यापुर्वी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपये घेतले. उर्वरित १० हजार नंतर घेवून असे सांगितले. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी सापळा रचला. यात तक्रारदाकडून तडजोडअंती ८ हजारा रूपये स्विकारतांना पोलीस उपनिरीक्षकाल रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यांनी केली कारवाई

    लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर यांनी ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.