Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ..प्रेयसीच्या पतीची हत्या ; कारण वाचून बसेल धक्का !
    क्राईम

    ..प्रेयसीच्या पतीची हत्या ; कारण वाचून बसेल धक्का !

    editor deskBy editor deskSeptember 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

     

    नाशिक रोड परिसरातील दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ ३० वर्षीय तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता असतांना त्याचा मृतदेह पोलिसांना छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला. प्रेम प्रकरणावरून या तरुणाची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. तोच धागा पकडत नाशिक पोलिसांनी अवघ्या २ तासात पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलंय.

    या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी जेलरोड येथील पंचक येथे राहणारा ३० वर्षाचा तरुण बेपत्ता झाला होता. यासंदर्भात त्याच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. सोमवारी या युवकाचा मृतदेह दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता सुरुवातीला ओळख पटली नाही.

    पोलिसांनी तपास केला असता मृतदेहाची ओळख पटली. बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून हा प्रेम प्रकरणावरून झालेला असावा असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अवघे २ तासात खून झालेल्या युवकाच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला संशयावरून ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी इतर दोन-तीन व्यक्तींना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सुभाष घेगलमल यांचे सह पथकांनी ही कामगीरी केली.

    #police Crime murder
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.