नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एका डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या प्रेमात लेफ्टनंट कर्नल पडला असतांना एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी एका महिलेचा मृतदेह कुचलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्यावेळी ही माहिती पोलिसांना समजली, त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेचा २४ तासाच्या आत छडा लावला असल्याचं पाहायला मिळालं आहे. ती महिला मुळची नेपाळची असल्याचे एका हिंदी वेबसाईटने सांगितले आहे. त्या महिलेच्या हत्या करणारा व्यक्ती दुसरा कुणी नसून लेफ्टनंट कर्नल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. हे प्रकरण उत्तराखंड राज्यातील देहरादून राजधानीतील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केलं आहे.
हे संपूर्ण प्रकरण प्रेम प्रकरणातील आहे. त्या डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेचं नाव श्रेया असं आहे. ती महिला लेफ्टनंट कर्नलला सिलिगुडीला एका बारमध्ये भेटली होती. त्यानंतर तीन वर्षे दोघांच्यात प्रेम संबंध होते. ज्यावेळी त्या लेफ्टनंट कर्नलची बदली देहरादूनला झाली. त्यावेळी तो त्या डान्सबार श्रेयाला घेऊन देहरादूनला आला. विशेष म्हणजे त्या लेफ्टनंट कर्नलने त्या महिलेसाठी एक घर सुध्दा खरेदी केलं होतं. लेफ्टनंट कर्नलचं नाव रमेंदु उपाध्याय असं आहे. ज्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी श्रेया सारखी पत्नीचं स्थान देण्यावरुन त्रास देत होती. त्यामुळे लेफ्टनंट कर्नल यांनी तिची हत्या केली आहे. लेफ्टनंट कर्नल यांनी राजपुर रोड येथील एका कल्बमध्ये तिचा दारु पाजली, त्यानंतर एका दुसऱ्या रस्त्यावर आले. त्यावेळी हातोड्याने तिच्या डोक्यात वार केले. हातोड्याने अधिक वार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे. पोलिसांनी लेफ्टनंट कर्नलचं नाव रमेंदु उपाध्याय यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. पोलिसांनी ज्यावेळी त्यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांना त्या महिलेची ओळख पटवण्यात अधिक अडचण झाली होती. कारण ती सिलीगुड़ी येथील रहिवासी होती.


