नाशिक वृत्तसंस्था: जग एकविसाव्या शतकाकडे जात आहे शिक्षणामध्ये मुलांबरोबर मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे मुली आज मोठ्या पदांवर काम करत आहे देश पातळीवर विश्व पातळीवर सुद्धा मुलींनी आपला ठसा उमटविला आहे.
असे असले तरी शिक्षण घेतले नावापुढे पदव्या लावल्या म्हणजे आपण सुशिक्षित झालो असे होत नाही असाच काहीसा प्रकार नाशिक येथे घडला चक्क डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी करण्याचा प्रयत्न होणार होता. त्यातही विशेष म्हणजे मुलीचा होणारा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये. यावर आता बोलणार तर काय?
धार्मिक दृष्ट्या नाशिक शहराला फार महत्त्व आहे हे या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो अशाच नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर एका हॉटेलमध्ये नुकताच एक विवाह सोहळा आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नववधू ही डॉक्टर वर वधु हा नेव्ही मर्चंट मध्ये काम करणारा होता मात्र लग्न झाल्यानंतर डॉक्टर नववधू असलेल्या मुलीची कौमार्य चाचणी होणार असल्याची तक्रार अर्ज अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आला होता त्यानुसार कार्यकर्त्यांनी त्रंबक पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला या प्रकरणातील संबंधितांवर कारवाईची मागणी केल
कौमार्य चाचणी ?
लग्नानंतर यात फक्त वधूची कौमार्य याचणी घेतली जाते. यात जातपंचायत आपण दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर वर आणि वधूंना झोपायला सांगते. या कपड्यांवर रक्ताचा डाग पडला, तरच ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा लग्न अमान्य केले जाते.
जातपंचायत मूठमाती अभियानानेच राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले की, आमचा जात पंचायतीविरोधात लढा सुरू आहे. एक समाज लग्नादिवशी कौमार्य चाचणी घेतो. खरे तर चारित्र्य आणि कौमार्याचा काहीही संबंध नसतो. केवळ जुनाट प्रथेच्या नावाखाली काहीही सुरू आहे. या अघोरी प्रथा थांबल्या पाहिजेत. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.