मुंबई : वृत्तसंस्था
एका ३७ वर्षीय महिलेला तिचे एडिट केलेले अश्लील फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या अनोळखी पाच पाकिस्तानी मोबाइल क्रमांकधारकांवर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला ३७ वर्षांची असून भाईंदर पूर्व परिसरात कुटुंबासह राहते. तिला पाकिस्तानी असलेल्या कोड मोबाइल क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीचे वारंवार कॉल येत होते. नंतर तिला तिचे एडिट केलेले अश्लील फोटो पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्यासह परिवाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. रविवारी महिलेच्या फिर्यादीवरून त्या पाच पाकिस्तानी कोड क्रमांक असलेल्या मोबाइलधारकांवर आयटी अॅक्टनुसार गन्हा दाखल केला आहे.