धुळे : प्रतिनिधी
प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीला मारहाण करणाऱ्या वडिलांसह काकाविरोधात साक्री पोलिस ठाण्यात मुलीने शनिवारी गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. हि घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नाडसे या गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता नीलेश भामरे (वय २१, रा. नाडसे ता. साक्री) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्मिता आणि नीलेश या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांच्या लग्नाला मुलीच्या पालकांची परवानगी नव्हती. तरीदेखील मुलीने प्रेमविवाह केला. तो राग मनात धरून वडील मधुकर यशवंत नेरकर (वय ४८) आणि काका अशा दोघांनी मुलीला मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता नाडसे गावात घडली. याप्रकरणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर मुलीने साक्री पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.