जामनेर : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील अल्पवयीन तरुणीचा नात्यानेच आत्याचा मुलगा असलेल्या तरुणाशी विवाह लावून देण्यात आला व लग्नानंतरच्या संबंधातून पीडीत तरुणी गर्भवती राहिली. तरुणी अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पतीसह तिचे आई-वडील, आत्या आणि मामा यांच्याविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आई वडीलांनी तिच्या आत्याच्या मुलासोबत लावला. विवाहानंतर तरुणी कात्रज पुणे येथे सासरी पतीसोबत गेली. जून 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पतीने शरीरसंबंध प्रस्थापीत केल्यानंतर तरुणी गर्भवती झाली. या घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे येथील हवालदार रवींद्र ओझय्या चिप्पा यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत पुण्याला गुन्हा दाखल केला. हा गुन्हा जामनेर पोलिसात वर्ग केला. तपास पोलिस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहेत.