जळगाव : प्रतिनिधी
देशातील हुकूमशाही मोडायची वेळ आलेली आहे. २०२४ ला सरकार बदलणारच आणि हा हुकूमशाहीचा फुगा तुम्हीच पडणार. आणि ही ताकद शिवसेना व तुमच्यामध्ये आहे. आतापासून सरकार हादरायला लागला आहे. गद्दार म्हणता आम्ही शिवसेची काँग्रेस होऊ देणार नाही. पण पंचवीस वर्षे भाजपसोबत सत्तेत असताना आम्ही कधीही शिवसेना भाजपचे होऊ द्यायचे नाही. आणि आता त्यांनी गुलामगिरी पत्करून दिल्लीला फेऱ्या मारत आहे. त्यामुळे कमळाबाईची पालखी हलवायला ही काही शिवसेना नाही, अशी ठाकरे शैलित उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्य शासनावर जळगाव येथील सभेत केली.
जळगाव येथे आज महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल व पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मानराज पार्क येथील मैदानात उद्धव ठाकरे यांची वचनपूर्ती सभा झाली. यावेळी व्यासपीठावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संजय नार्वेकर, चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह शिवसेनेचे आदी पदाधिकारी व्यासपीठावर होते. भाषणात पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची आता दिसेल तिथे घुसेल अशी वृती झाली आहे. आयोजित जसे राम मंदिर बांधले आहे तसे भाजपने सद्या राज्यामध्ये आयाराम मंदिर बांधले आहे. आमच्यातल्याच काही गद्दार केंद्राने सांगितल्यावर त्यांनी या पक्षातून त्या पक्षात बेडूक उड्या मारल्या आहे. आपले राज्याचे बेकायदा मुख्यमंत्री यांना दिल्लीमधील चमकोगिरी करण्यासाठी वेळ आहे पण महाराष्ट्रातील आंदोलन करताना भेटण्याला त्यांना वेळ नाही. जसं देशात जालियनवाला घडला होता तसं महाराष्ट्रात जालना वाला घडले आहे. आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो म्हणून त्यांनी धसका का घेतला आणि इंडिया नाव बदलण्याचा निर्णय घेतला व भारत केला. आम्हाला इंडिया, भारत आणि हिंदुस्तान देखील देशाचे नाव चालते. भ्रष्टाचाराच्या नावाखाली आमच्या शिवसैनिकांना त्रास देत आहे. परंतु तिकडे परदेशात एडवोकेट मोहन साळवी यांचे लग्नाला देशाचा हजारो कोटी रुपये येऊन घेऊन पळून गेलेला ललित मोदी हजेरी लावतो. पण या मोदी सरकारला त्यांना पकडायला त्यांच्यावर कारवाई करायला ते का घाबरतात खणखणीत टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. दिल्लीमध्ये जी ट्वेंटी परिषद सुरू आहे त्याचे आपले कायदा मुख्यमंत्री यांना जाण्याला वेळ आहे. पण आपल्या राज्यातील आंदोलन करताना भेटायला त्यांना वेळ नाही अशी परिस्थिती या बेकायदा म्हणून मुख्यमंत्र्याची आहे. या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही कामाला लागा
तुमच्याच ताकदीवर या देशात व राज्यात बदल घडवून सर्वसामान्य व शेतकऱ्यांना त्यांचा हक्क व न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. देशात मोदी सरकार फक्त योजनेचा भ्रम नागरिकांमध्ये पसरवत आहे.