• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बस व कारचा भीषण अपघात : दोन ठार !

editor desk by editor desk
September 9, 2023
in क्राईम
0
बस व कारचा भीषण अपघात : दोन ठार !

नाशिक : वृत्तसंस्था

 

राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या नियमित वाढ होत असून आज नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावरील करंजाळीजवळ शुक्रवारी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघेजण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला असून करंजाळी बस अपघातातील मृतांची संख्या ४ वर पोहचली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरत येथील चार तरुण देवदर्शनासाठी आले होते. यावेळी ते देवदर्शन करून नाशिकहून परतीचा प्रवास करत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वरील करंजाळी गावानजीक नाशिकहून गुजरातकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक जीजे ०६ एफसी ३३३१ हिने पेठ आगारची पेठ-पुणे बस क्रमांक एमएच ०४ वाय ५९७४ या बसला (Bus) समोरून धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, कारचे इंजिन तुटून बस खाली गेले. तर समोरील एअर बॅग फुटून चालक व पुढील सिटवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. तसेच मागील सीटवरील किसन छगनभाई वाघासीया (३२) व रविभाई प्रविणभाई दोबारीया (२६) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर चालक जैनिश मुकेशभाई सुतारीया (२४) व जयदीप लभूभाई गोयानी (३२) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले होते. मात्र, आता उपचार सुरु असतानाच दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी एसटी चालक शिवानंद ताजणे यांच्या फिर्यादीवरुन कार चालक जैनिश सुतारीया यांच्याविरुद्ध भादवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्यात (Police Station) अपघाताची नोंद झाली आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास पो.नि.व्ही.एस. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवा. झिरवाळ करीत आहेत.

Tags: #policeCrime
Previous Post

तरुण-तरुणी ‘त्या’ अवस्थेत सापडल्याने ; गावकऱ्यांनी अशी दिली शिक्षा !

Next Post

बेकायदेशीर पिस्तूल खरेदी केली अन घडल ते धक्कादायक !

Next Post
बेकायदेशीर पिस्तूल खरेदी केली अन घडल ते धक्कादायक !

बेकायदेशीर पिस्तूल खरेदी केली अन घडल ते धक्कादायक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group