• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पठ्याने मैत्रिणीवर उडविले ५२ लाख अन फसला !

editor desk by editor desk
September 9, 2023
in क्राईम
0
पठ्याने मैत्रिणीवर उडविले ५२ लाख अन फसला !

यवतमाळ : वृत्तसंस्था

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भरभक्कम असा परतावा मिळतो, असे आमिष दाखवून यवतमाळातील तब्बल नऊ जणांना गंडविण्यात आले. या ठगबाजाला आर्थिक गुन्हे शाखेने नागपूर पोलिसांकडून ताब्यात घेतले. पोलिस कोठडीत असलेल्या ठगबाजाचे अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत. त्याने मैत्रिणीवर चक्क ५२ लाख रुपये उडविले. ताज हॉटेल लखनऊ, रेडिसन ब्ल्यू हॉटेल नागपूर येथेही लाखोंच्या पाठ्य त्याने केल्याची कबुली दिली.

अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (३०, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने यवतमाळातील नऊ जणांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गंडविले. यात त्याला यवतमाळातील महादेवनगर येथे राहणाऱ्या मीरा फडणीस यांनी सहकार्य केले. नागपूर पोलिसांनी होशिंग याला शिताफीने अटक केली त्यानंतर यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेने होशिंग याला प्रोड्युस वॉरंटवर ताब्यात घेतले. सलग दहा दिवस पोलिस कोठडीत असलेल्या होशिंगकडून ठगविलेल्या रकमेचे काय केले याचे मजेदार कारनामे पुढे येऊ लागले आहेत. त्याची साथीदार मीरा फडणीस हिला न्यायालयाने तात्पुरता जामीन दिला आहे. हा जामीन रद्द करावा, यासाठी पोलिसांकडून न्यायालयात बाजू मांडली जाणार आहे.
मीरा फडणीस हिला ठगबाज होशिंग याने महागड्या भेटवस्तू दिल्या. यात डायमंड नेकलेस सेट, सोने-चांदीचे ताट, वाटी, सोन्याची चेन, मोबाइल, दुचाकी अशा वस्तू मीरा फडणीस व तिची मुलगी शर्वरी हिला भेट दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या वस्तू जप्त केल्या.

Tags: #policeCrime
Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; तीन मोबाईल चोरटा ताब्यात !

Next Post

गावाची बदनामी होतेय म्हणत सहा जणांनी केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य !

Next Post
गावाची बदनामी होतेय म्हणत सहा जणांनी केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य !

गावाची बदनामी होतेय म्हणत सहा जणांनी केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group