लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत 53.5 टक्के मतदान झाले होते जिल्हा बँकेमध्ये मुख्यतः सहकार पॅनल व शेतकरी पॅनल यांच्यात लढत आहे सहकार पॅनल मध्ये शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा समावेश आहे तर शेतकरी पॅनल मध्ये भाजपा काँग्रेस व राष्ट्रवादीमधील बंडखोर या उमेदवारांचा समावेश आहे.
जिल्हा बँकेच्या चार विविध कार्यकारी सोसायटी आणि पाच राखीव जागांसाठी आज मतदान होत आहे. यात ४२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पंधरा तालुक्यांत मतदान केंद्र आहे. सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदानाची वेळ आहे. एकूण दोन हजार ८५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.