पाचोरा : प्रतिनिधी
येथे होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम 9 सप्टेंबर ऐवजी आता 12 सप्टेंबर ला होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे. 9 तारखेला मुख्यमंत्र्याचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पाहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी होणारा दि.२६ ऑगस्ट रोजीचा पाचोरा दौरा स्थगित झाला होता त्यानंतर हा दौरा ९ सप्टेंबर रोजी होईल असे सांगत आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र त्यात पुन्हा एकदा बदल झाला असून आता हा दौरा १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
पाचोरा-भडगाव तालूकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी ना.एकनाथराव शिंदे यांचेसह या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, मंत्रीअब्दुल सत्तार, मंत्री दादा भुसे, मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपास्थिती लाभणार आहे.
नर्मदा ऍग्रोचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन
पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आटोपल्यावर नांद्रा ता. पाचोरा येथील नर्मदा ऍग्रो या फॅक्टरीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांचे हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण ,खासदार,आमदार व सर्व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.