• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तब्बल दीडशे घरफोडी करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
September 8, 2023
in क्राईम
0
तब्बल दीडशे घरफोडी करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था

 

राज्यातील अनेक शहरात चोरीसह घरफोड्या करणाऱ्या अनेक टोळी सक्रीय झाल्या आहे. अशा अनेक फरार टोळ्यांच्या मागावर पोलीस असतांना एका टोळीतील सदस्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने दहा, वीस नव्हे तर तब्बल दीडशे घरफोड्या केल्या होत्या. परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले गेले. नेहमीचकवा देऊन तो फरार होत होता. गुन्हेगारांचे अपराध कधीतरी पूर्ण होतात, त्या पद्धतीने त्याच्या अपराधांचा कोटा पूर्ण झाला अन् अखेर पुणे पोलिसांच्या सापळ्यात तो आला. यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दीडशे घरफोडीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे येथील कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर हडपसर, बिबवेवाडी, सासवड, अलंकार, लोणीकंद, खेड, कोथरूड, दत्तवाडी, पंढरपूर, वानवडी पोलीस ठाण्यावर गुन्हे दाखल होते. संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (40, रा. थेऊर रोड, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 37 तोळे वजनाचे 22 लाख 20 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.

आरोपी संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी याला कोंढवा पोलिसांनी पकडले आहे. तो मध्यरात्रीच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करत होता. त्याच्यावर यापूर्वी दीडशे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. परंतु अनेक वर्षांपासून तो फरार होता. पोलिसांना सापडतच नव्हता. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्यात तो अडकला. संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी याला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासात यासंदर्भात काय माहिती उघड होते, हे ही आता काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. आरोपी कल्याणी याने फक्त पुणे शहरात घरफोड्या केल्या की इतर ठिकाणी केल्या, हे आता स्पष्ट होणार आहे.

Tags: #policechoriCrime
Previous Post

पाऊस आल्याने जळगाव जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; अजून पावसाची अपेक्षा..! 

Next Post

महामार्गावर बसचा भीषण अपघात : ८ प्रवासी जखमी !

Next Post
महामार्गावर बसचा भीषण अपघात : ८ प्रवासी जखमी !

महामार्गावर बसचा भीषण अपघात : ८ प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group